+91 9773076801 Navi Mumbai-400614.

HomeGallery

Gallery

नवी मुंबई मध्ये गुंतवणूक का !!!

नवी मुंबई हे एक नियोजनबद्ध आणि जलद वेगाने विकसित होणारे शहर आहे. नवी मुंबई व त्याअंतर्गत विविध नोड मधील पायाभूत सुविधा व औद्योगिक विकास करण्यासाठी १७ मार्च १९७० रोजी सिडकोची स्थापना करण्यात आली.

नवी मुंबई शहर हे  ऐरोलीपासून पनवेलपर्यंत आणि पनवेलपासून उरणपर्यंत विस्तारलेले आहे. नवी मुंबईमधील वेगाने होणारा विकास, येथील कनेक्टिव्हिटी – मुंबई आणि नवी मुंबई ह्यांना जोडणारे रेल्वे मार्ग, हार्बर लाईन, ट्रान्स-हार्बर लाईन, पनवेल ते रोहा मार्ग तसेच रोड कनेक्टिव्हिटीमध्ये  सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, पनवेल-उरण  रोड व जे.एन.पी.टी.  कनेक्शन यामुळे नवी मुंबई हे सर्व शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. येथील आधुनिक सोयीसुविधा, विकासाची संधी, चांगल्या दर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळा – कॉलेज इत्यादींमुळे नवी मुंबईमध्ये घर घेण्याचे अनेक फायदे आहेत.  सिडकोच्या नवनवीन सुधारणा, औद्योगिकीकरणावर भर, नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या  योजना ह्यामुळे गेल्या ५५ वर्षांपासून नवी मुंबईचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो , अटल सेतू  हे काही मुख्य प्रकल्प , तसेच  मेट्रो लाइन 8, ‘गोल्ड लाइन’, विरार अलिबाग कॉरिडॉर, कल्याण – तळोजा मेट्रो यांसारखे प्रकल्प प्रस्तावित आहेत.

नवी मुंबई तसेच विस्तारित होणारी तिसरी मुंबई आणि नवनवीन प्रकल्प ह्यामुळे अनेक सुखसोयी बरोबर रोजगारासाठी देखील येथे नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई हे सध्या परवडणाऱ्या घरांसाठी, सुव्यवस्थित जीवनशैलीसाठी आणि उत्तम भविष्याच्या दृष्टीने एक प्रमुख ठिकाण ठरले आहे.  सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांमुळे सामान्य  नागरिकांसाठी इथे घर घेणं आता अधिक सुलभ झालं आहे. अशा विकसनशील शहरात चांगल्या दर्जाचे जीवन अनुभव आपण घेऊ शकता. परवडणाऱ्या दरात घर घेण्यासाठी सिडकोच्या उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा आपण नक्कीच लाभ घेतला पाहिजे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील मुंबई शहराजवळचा प्रस्तावित विमानतळ आहे. हे विमानतळ महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उलवे येथे बांधले जाणारे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पूर्ण झाल्यावर, ते मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे विमानतळ बनेल, जे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत सेवा देईल.

हे विमानतळ शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) द्वारे तयार केलेले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विमानतळ पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येथील आसपासच्या परिसरातील उदद्योगांना देखील चालना मिळेल. ह्या विमानतळामुळे आसपासच्या क्षेत्रांत गुंतवणूकीची शक्यता वाढेल.