Guidance For CIDCO Housing Schemes
CIDCO stands for City and Industrial Development Corporation of Maharashtra, which is a government-owned undertaking in Maharashtra, established on 17th March 1970. CIDCO is responsible for planning, developing, and managing urban infrastructure, providing municipal services and executing large-scale projects in the new towns from last 55 Years in Navi Mumbai.
The recent scheme was organized by the CIDCO “Maze Pasantiche Ghar” providing affordable 26000 Houses out of 67000 in Navi Mumbai.
These Houses are located across various nodes in Navi Mumbai including Taloja, Kharghar, Vashi, Panvel, Khandeshwar, and Ulwe between 25L To 74L for 1 BHK & Above 95L for 2BHK.
It aims to fulfil the housing needs of Economically Weaker Section (EWS) through the Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) and Lower Income Group (LIG). The scheme offers a chance to choose preferred homes within designated locations, with preferences considered during the allocation process.
So be ready for the Remaining Houses Scheme which will come soon and for that purpose we are ready to guide you on how can be eligible for getting houses with smooth process.
सिडको (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ) गेल्या ५५ वर्षांपासून नवी मुंबई मध्ये शहरी पायाभूत सुविधांचे नियोजन, विकास आणि व्यवस्थापन आणि नवीन शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबविण्याचे कार्य करीत आहे.
अलीकडेच सिडकोद्वारे “माझे पसंतीचे घर” ही योजना आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये नवी मुंबईतील ६७००० घरापैकी २६००० घरासाठी लॉटरी काढण्यात आली होती. ही परवडणारी घरे तळोजा, खारघर, वाशी, पनवेल, खांदेश्वर आणि उलवे यासह नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये आहेत. घरांच्या किमती २५ लाख ते ७४ लाखांच्या दरम्यान १ बी एच के आणि ९५ लाखाच्या वर २ बी एच के साठी उपलब्ध होत्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) तसेच कमी उत्पन्न गट (LIG) अशा उत्पन्न गटाद्वारे घर निवडण्याची संधी ह्या योजनेमध्ये होती. योजनेच्या प्रक्रियेदरम्यान प्राधान्ये विचारात घेऊन नियुक्त केलेल्या ठिकाणी पसंतीची घरे निवडण्याची संधी ह्यामध्ये उपलब्ध होती. उर्वरित घरांच्या येणाऱ्या योजनेसाठी इच्छुक असाल तर त्यासाठी सुरळीत प्रक्रियेसह घरे मिळविण्यासाठी पात्र कसे व्हावे याचे मार्गदर्शन करण्यास वास्तुकनेक्ट तयार आहे.
Guidance for Government Affordable Houses
(EWS Housing Scheme
)
The State Government regulates that the Builders developing a housing Project above 4000 sq. mtr plot must reserve 20% FSI of the built up sanctioned Area for affordable Housing, It will benefit to the economically weaker Sections (EWS) and Low Income groups (LIG) Criteria. The Costs of these Houses are based on Construction Cost at the Government Rate. It comes approximately 30% to 40% less than the Market prices of the houses.
A Lottery will be conducted to select Eligible Applicants for the Scheme through allotment. After all verification process, Allotment Letters will be issued and the list of the successful Applicants will be provided to the Developer through authorities. The Possession and other Legal process will be done by the Developer afterwords.
राज्य सरकारच्या नियमानुसार ४००० चौरस मीटरपेक्षा जास्त जागेच्या प्लॉट मध्ये गृहनिर्माण प्रकल्प उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी मंजूर क्षेत्रफळाच्या २०% क्षेत्रफळ हे परवडणाऱ्या घरांसाठी राखीव ठेवणे हे नियमानुसार आहे. प्राप्त राखीव क्षेत्रफळाची घरे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या उत्पन्नगटानुसार म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) घरे उपलब्ध करून देण्यात येतात. या घरांच्या किमती शासनाच्या बांधकाम खर्चावर आधारित असतात. त्यामुळे बाजारभावाच्या तुलनेत सुमारे ३०% ते ४०% पर्यंत कमी असतात.
या योजनेसाठी पात्र होण्याकरिता प्राधिकरणाकडून अर्ज मागविले जातात व पात्र अर्जदाराची लॉटरी काढली जाते. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाकडून वाटप पत्रे जारी करून त्या प्रकल्पाच्या विकासकाला यशस्वी अर्जदाराची यादी प्रदान केली जाते. त्यानंतर पुढील प्रक्रिया व कायदेशीर ताबा देणे ही विकासकाची जबाबदारी असते.
Guidance for MHADA Housing Scheme
MHADA stands for Maharashtra Housing and Area Development Authority, which is a government organization in Maharashtra, focused on providing affordable houses to citizens. It aims to improve the standard of living by offering housing options and Redevelopment.
Recently ‘Book My Home’ Scheme is launched by MHADA, These Houses are available at various premium locations across Mumbai, Pune, Kokan, Thane region at affordable Price range i.e. between 13L to 41L approx – 1 BHK Flats.
Citizens who want to apply for the Scheme can check the online application form. These Houses are economically Beneficial to the Citizens as per their Income Group to get housing opportunities.
म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण) ही महाराष्ट्रातील एक सरकारी संस्था आहे जी नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते. गृहनिर्माण पर्याय आणि पुनर्विकास देऊन राहणीमान सुधारण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. म्हाडाने अलिकडेच ‘बुक माय होम’ ही योजना सुरू केली आहे. ही घरे मुंबई, पुणे, कोकण, ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी परवडणाऱ्या किमतीत म्हणजेच १३ लाख ते ४१ लाख दरम्यान – १ बीएचके फ्लॅटमध्ये उपलब्ध आहेत. ही योजना नागरिकांना त्यांच्या उत्पन्न गटानुसार घरांच्या संधी मिळविण्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणारे नागरिक ऑनलाइन अर्ज भरून पात्र होऊ शकतात.
Our Available Services (आमच्या उपलब्ध सेवा )
- Online Application Form Filling & Registration process Guidance
(ऑनलाइन अर्ज भरणे आणि नोंदणी प्रक्रिया मार्गदर्शन) - Documentation Completion & uploading
(अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे व अपलोड करणे) - Get the right guidance today to secure the best price for your property tomorrow.
(आपल्या मालमत्तेसाठी भविष्यात सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी, आजच योग्य मार्गदर्शन घ्या.) - Legal Documentation (Affidavits & Others) Guidance
(कायदेशीर कागदपत्रे (प्रतिज्ञापत्रे आणि इतर) बनवणे)
- Guidance for Selection Process for Floor, Building, Node, Sector, etc.
(मजला, इमारत, नोड, सेक्टर इत्यादी निवड प्रक्रियेसाठी मार्गदर्शन) - Guidance for Payment Process like EMD/ confirmation Amount etc.
(ईएमडी/पुष्टीकरण रक्कम इत्यादीसारख्या देयक प्रक्रियेसाठी मार्गदर्शन) - Guidance for Loan Process
(कर्ज प्रक्रियेसाठी मार्गदर्शन)
Guidance for Shops Purchase
CIDCO sales shops through E-Auction for Commercial Utilisation. These Shops are available in different sizes in CIDCO Township Areas and it can be used for different purposes like Vegetable Shops, Grocery Shops or Restaurant etc. The prices of Shops are not fixed. It should confirm thru E- Auction process. The Shops are offered through an e-tendering or e-auction process. To participate in the program, interested clients must register online. Specific eligibility criteria (Base Rate) have been outlined in the scheme announcement. The Highest Cost Bidder will be the winner for the Scheme.
A Lottery will be conducted to select Eligible Applicants for the Scheme through allotment. After all verification process, Allotment Letters will be issued and the list of the successful Applicants will be provided to the Developer through authorities. The Possession and other Legal process will be done by the Developer afterwords.
व्यवसायिक वापरासाठी सिडकोची इ-लिलावाद्वारे दुकाने विक्रीची योजना वेळोवेळी प्रसिद्ध होत असते.ही दुकाने सिडको टाऊनशिप मध्ये भाजीपाला, किराणा किंवा रेस्टॉरंट अशा विविध वापरासाठी विविध आकारात उपलब्ध असतात. दुकानांच्या किंमती निश्चित केलेल्या नसतात. परंतू ई-लिलाव प्रक्रियेद्वारे त्या निश्चित केल्या जातात. ह्या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असते. इच्छुक असलेल्या ग्राहकांना ऑनलाइन नोंदणी करून सहभागी होता येते. विशिष्ट पात्रता निकष (बेस रेट) ह्यामध्ये नमूद केलेले असतात, त्यापेक्षा जास्त किंमत नमूद करून दुकान मिळविणे शक्य होते. लिलावात अर्जदाराची यशस्वी बोलीद्वारे निवड केली जाते.
Our Available Services (आमच्या उपलब्ध सेवा )
- Guidance for Registration Process
(नोंदणी प्रक्रियेसाठी मार्गदर्शन) - Documentation Completion & Upload
(अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे व अपलोड करणे) - Guidance for Selection of Shop & Rate respectively
(दुकान आणि त्यासाठीचा दर निवडण्यासाठी मार्गदर्शन)
Guidance for Plot Tenders (Residential + Commercial)
CIDCO sales Commercial and Residential Plots through E-Auction. These plots are available from approx 40 mtr to 4000 mtr in different Node and for different purpose like Row House, Bungalow Plots, Residential and Commercial Plots etc. These Tender Plots are not fixed in Prices and confirm thru E- Auction process. The Location differentiate the prices of the Plots. The process for Bidding/E-auction is completely online. The Plots are then offered through this process. Specific eligibility criterias (Base Rate) have been outlined in the scheme announcement. The process involves selecting the successful bidders or applicants through highest Bid.
सिडको ई-लिलावाद्वारे व्यावसायिक आणि निवासी भूखंडांची विक्री करते. हे भूखंड सुमारे ४० मीटर ते ४००० मीटर पर्यंत वेगवेगळ्या नोडमध्ये आणि रो-हाऊस, बंगला, निवासी तथा व्यावसायिक भूखंड अशा वेगवेगळ्या उद्देशांसाठी उपलब्ध असतात. ह्या भूखंडाच्या किमती निश्चित केलेल्या नसतात. ई-लिलाव प्रक्रियेद्वारे त्या निश्चित केल्या जातात. भूखंडांच्या किंमती स्थानानुसार भिन्न असू शकतात. बोली/ई-लिलाव प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन आहे. ह्या प्रक्रियेद्वारे भूखंड ऑफर केले जातात. विशिष्ट पात्रता निकष (बेस रेट) ह्यामध्ये नमूद केलेले असतात. लिलावात अर्जदाराची यशस्वी बोलीद्वारे निवड केली जाते.
Our Available Services (आमच्या उपलब्ध सेवा )
- Guidance for Registration Process
(नोंदणी प्रक्रियेसाठी मार्गदर्शन) - Documentation Completion / Upload
(अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे व अपलोड करणे) - Guidance for Selection of Node & Rate respectively
(नोड आणि दर निवडण्यासाठी मार्गदर्शन) - Node wise selection of Plots & Utilization as per Location
(स्थानानुसार भूखंडांची निवड आणि वापर यासाठी मार्गदर्शन)
- Proper Guidance about the FSI (Floor Space Index) of the Plot
(प्लॉटच्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) बद्दल योग्य मार्गदर्शन ) - Multi-storeyed or commercial use of plot in respect of Construction
(बांधकामाच्या बाबतीत भूखंडाचा बहुमजली किंवा व्यावसायिक वापर यासाठी मार्गदर्शन) - Complete Project Report
(संपूर्ण प्रोजेक्ट रीपोर्ट साठी मार्गदर्शन) - Architectural, Engineer Services
(आर्किटेक्चर, इंजिनियर सेवा)